औरंगाबाद शहराच्या राजकीय इतिहासाच्या पाऊलखुणा

 प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर झाला आणि महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झाली. भावी नगरसेवक म्हणून मिरवणारे तर गुडघ्याला बाशिंग बांधून उतावीळ नवरदेवासारखे बोहल्यावर चढायला तयारच आहेत. मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहराचा राजीकय इतिहास फार भूषणावह नाही, या शहराणे अनेक दंगली बघितल्या दंगलीत होणारी होरपळ या शहराने अनुभवली आहे. निवडणूक आणि दंगल जणू हे काय समीकरणच बनले की काय? हा प्रश्न सामान्य औरंगाबादकरां नाफ व्यथीत करणारा आहे. आजची तरुणाई राजकारणाकडे आकर्षित होत असताना शहराच्या राजका रणाचा इतिहास आणि आजचे वास्तव याविषयी घेतलेला हा आढावा. स्वातंत्र्यानंतर देशभरात काँग्रेसी विचारांचं वादळ होत, देशाच्या कानाकोपऱ्यात काँग्रेस आणि काँग्रेस चा कार्यकर्ता पोहचलेला होता, औ- रंगाबाद शहरावर देखील काँग्रेसीचा प्रभाव होता इथल्या स्थानिक राजकारणावर काँग्रेसी नेत्यांची मज बूत पकड होती. स्थानिक निवडणुकांमध्ये देखील काँग्रेस आणि काँग्रेस च बघायला मिळत असे.८० च्या दशकापर्यंत काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाही अशा प्रकारची परिस्थिती होती. औरंगाबाद महापालिका आणि लोकसभेवर देखील कॉंग्रेसचे एकहाती वर्चस्व होते.

पुढे ८० च्या दशकात घडलेल्या एका घटनेने औरंगाबाद शहराचे राजकारण पूर्णतः बदलून गेले. मराठवाड्यात आज गावागावांत शिवसेनाप्रमुखांच्या विचारांनी भारावलेली मंडळी आहेत. शिवसेनेच्या शाखा आहेत. अडचणीच्या वेळेस मदतीला धावून जाणारे शिवसेनेचे कार्यकर्ते पाहायला मिळतात. मराठवाड्यातील शिवसेनेची सुरवात झाली ती औरंगाबाद शहराच्या गुलमंडी येथून ८ जून १९८५ रोजी तरुणांनी एकत्र येऊन गुलमंडीवर शिवसेनेची पहिली पाटी रोवली. रमेश आमराव, चंद्रकांत खैरे, प्रदीप जैस्वाल हे शिवसेनेचे त्या काळातील आघाडीचे सेनापती होते. तर सुभाष पाटील ह औरंगाबाद शिवसेनेचे पाहिले जिल्हाप्रमुख.

जय भवानी, जय शिवाजी म्हणत वाटचाल सुरू झाली. मुंबई, ठाण्यात घुमणारी शिवसेनेच्या वाघाची डरकाळी औरंगाबादेत ऐकायला यायला लागली. गुलमंडीवर सुरू झालेल्या शाखेला चांगला प्रतिसाद मिळाला. बाळासाहेबांच्या विचाराने भारावलेल्या तरुणांची फ्फौज शिवसेनेत दाखल व्हायला लागली तसा संघटनेचा विस्तार झाला. गुलमंडीनंतर पदमपुरा, हमालवाडा करत करत शहराच्या अनेक भागांत शिवसेनेचा भगवा झेंडा आणि पाटी झळकली. गावागावांतून लोक आमच्या गावात शाखा स्थाप न करा म्हणत शिवसैनिकांना स्वखर्चाने घेऊन जायचे. ८५ ते ९० हा पाच वर्षांचा काळ शिवसेना शह राप्रमाणेच खेड्यापाड्यात पोचण्याचा होता.

शिवसेनेने औरंगाबाद शहरात :

जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे, दंगलीत समोरासमोर उभे राहण् पोलिसांच्या काठ्या अंगावर झेलत हिंदूंचे रक्षण करणारे शिवसेना कार्यकर्ते घडले ते शिवसेना प्रमु बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावशाली वक्तृत्वाने अन् प्रखर विचारांनी. शिवसेनाप्रमुखांचे गारूड मराठी माणूस व हिंदू जनतेच्या मनावर झाले. शिवसेनेचे लोण मुंबई, ठाण्यानंतर ऐतिहासिक औरंगाबादमधून संपूर्ण मराठवाड्यात पोचले.

मराठवाड्यात आज गावागावांत शिवसेनाप्रमुखांच्या विचारांनी भारावलेली मंडळी आहेत. शिवसेनेच्या शाखा आहेत. अडचणीच्या वेळेस मदतीला धावून जाणारे शिवसेनेचे कार्यकर्ते पाहायला मिळतात. जय भवानी, जय शिवाजी म्हणत वाटचाल सुरू झाली. मुंबई, ठाण्यात घुमणारी शिवसेनेच्या वाघाची डरका ळी औरंगाबादेत ऐकायला यायला लागली. गुलमंडीवर सुरू झालेल्या शाखेला चांगला प्रतिसाद मिळाला. बाळासाहेबांच्या विचाराने भारावलेल्या तरुणांची फ्फ़ौज शिवसेनेत दाखल व्हायला लागली तसा संघटने चा विस्तार झाला.

हिंदूंचे रक्षण हा मुख्य अजेंडा घेऊन मैदानात उतरलेल्या शिवसेनेने १७ जानेवारी १९८६ ला पहिला मोर्चा शहरातून काढला. काळे धंदे बंद करा, मुस्लिमांची गुंडगिरी रोखा, सिल्लेखाना शहरातून हद्दपार करा आणि समान नागरी कायदा लागू करा या मागण्यांसाठीचा हा मोर्चा होता. क्रांती चौका पासून जि ल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असतानाच सिटी चौकात मोर्चावर दगडफ फेक झाली, दगडाला दगडाने उत्तर दिले आणि जातीय दंगलीचा भडका उडाला. शिवसेनाच आमची रक्षणकर्ती हा विश्वास शहरवासी यांना देण्यात संघटना यशस्वी ठरली. राजकीय सुरवात १९८८ च्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना राजकारणात उतरली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मराठवाड्यातली पहिली सभा झाली. त्यावेळी प्रथमच शिवसेनेचे तब्बल २७ नगरसेवक निवडून आले. औरंगाबादच्या राजकीय इतिहासात चमत्कार घडवला तो शिवसेनाप्रमुख बाळ ासाहेब ठाकरे यांनी. नंतरच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेवर व शिवसेनाप्रमुखांवर येथील मतदारांनी भरभरून प्रेम केले. याबद्दल मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील विजयी सभेत त्यांनी लाखोंच्या समुदायाला साष्टंग दंडवत घालून कृतज्ञता व्यक्त केल्याची आठवण अनेक जुने शिवसैनिक आजही सांगतात.

टिप्पण्या