गुलामी नष्ट करण्याचे प्रतीक म्हणजे भिमाकाेरेगाव

 पेशवाई म्हणजे एकाच जातीचे वर्चस्व,पेशवाई म्हणजे गुलामगिरीचे माहेरघर या माहेरघरात पेशव्यांनी सत्तेच्या बळावर माणसांना गुलामगिरीत डांबून ठाकले. महार - मांगाच्या गळ्यात पेशव्यांनी मडकी बांधली, कमरेला बांधलेल्या झाडूने रस्ता झाडत त्यांना नगर प्रवेश करावा लागे. सकाळी नि सायंकाळी जेव्हा सावल्या लांबवर पडतात तेव्हा दलितांना प्रवेशबंदी घातली गेली यांचे कारण राॅबर्टसन यांनी त्यांच्या " महार फाेक ए स्टडी ऑफ अनटचेबल्स इन महाराष्ट्र"या ग्रंथात दिले ते असे की" पेशव्यांच्या घराण्यातील एका स्त्रीचे व गणपती तुकाराम नावाच्या एका महार तरूण शिपायासाेबत प्रेम आणि शरीरसंबंध होते असा संशय पेशव्यांना आला म्हणून त्या तरूणाचा गुलटेकडीवर शिरच्छेद करण्यात आला तेव्हा महारांना जरबेत ठेवण्यासाठी पेशव्यांनी अशा क्रुर नितीचा उपयोग केला.

  १४ वर्षाच्या मुक्ता साळवे यांनी महार-मांगाच्या दु:खा विषयी निबंध लिहला आहे. त्यामध्ये पेशव्यांनी अस्पृश्याप्रती केलेल्या क्रुर कृत्यांच्या आठवणी त्यांनी दिलेल्या आहेत. अस्पृश्यांना हत्तीच्या पायी देणे,त्यांच्या शिराचा चेंडू करून गुलटेकडीच्या मैदानात खेळणे या अमानवी क्रुर आठवणी मुक्ता आपल्या निबंधात लिहते.  

 पेशवाई ही अस्पृश्यांना हीन, तुच्छ आणि ब्राम्हणेत्तरांना दुय्यम मानणारीच होतीच.पण सत्ताहीन ब्राम्हांणासाठी व सुंदर दिसर्णाया स्त्रीयासाठीही चांगली नव्हती. "पेशवेकालीन पुणे" या ग्रंथामध्ये असे वर्णन आले आहे की, " आब्रुदार ब्राम्हणांनी पुणे साेडले होते." शनिवार वाड्याला प्रिय झालेली स्त्री काेणाचीही असाे तिला पेशव्यांची शेज सजवावीच लागे.यामध्ये ब्राम्हण जातीच्या महीला सुध्दा अपवाद नव्हत्या हे समस्त ब्राम्हण स्त्रीयांस जाहीर असावे. 

 पेशव्यांनी गुलामांना जसे घहान ठेवता येत होते, तसेच बहुजन समाजातील स्त्रीयांना घहान ठेवले याचे उदा: "बाळाजीपंत नातूचा नाेकर 'गाडेकर 'नावाचा त्यांची पत्नी गंगा कुणबीन घहान ठेऊन तिच्यावर त्याला चिपळूनकरांनी २०रू.कर्ज दिले होते.

 या पुढे जाऊन दुसरा बाजीरावाने शनिवार वाड्यात स्त्रीयाच्या नग्न शर्यती लावल्या शनिवारवाडा छिन्नालवाडा पेशव्यांनी केला होता.असंंख्य स्त्रीच्या चारित्र्याचा खून पेशव्यांनी केला. या संदर्भात सावित्रीबाई फुले यांनी त्याच्या काव्यफुले या ग्रंथात लिहले आहे की

 " तुला बाेलवी बाजी शाैरीधनी गं

स्वपत्नीस धाडे निलाजरा पती गं

अशी ब्राम्हणीला छळे स्त्रेणशाही

मुखा बाेलती त्या जळाे पेशवाई।"

 महार -मांग, स्त्रिया आणि बहुजन समाज यांचे सामाजिक,धार्मिक,आर्थिक,लैगिक,मानसिक,शाररिक शाेषण करणार्या पेशवाईचे निर्मुलन करणार्या महार सैनिकांच्या शाैर्याचे आणि मुक्तीचे प्रतीक म्हणजे हा भिमाकाेरेगावचा विजयस्तंभ"  हा स्तंभ शाेषण,गुलामी यांच्या निर्मुलनाचे प्रतिक आहे.

टिप्पण्या