स्मार्ट सिटीची स्मार्ट परी

 केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबादचा समावेश दुसन्या टप्प्यात झाला. औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी, त्यामुळे मराठवाड्यातून किमान औरंगाबादचा समावेश तरी या योजनेत झाला पाहिजे, अशी भावना होती. यामागे दोन कारणे होती. पहिले, शहराच्या ठप्प झालेल्या विकासाचे होते. महापालिकेची तिजोरी कायम ऑक्सिजनवर असल्याने गेल्या काही वर्षांत शहरात पा याभूत कामे झाली नव्हती. स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला तर किमान काही कामे होतील अशी अपेक्षा होती आणि दुसरे कारण म्हणजे स्मार्ट सिटी या गोंडस नावाचे होते. काही नावीन्यपूर्ण कामे झा ल्यास औरंगाबाद 'स्मार्ट शहर' म्हणून ओळखले गेले असते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात नापास झाल्या वर दुसऱ्या टप्प्यात प्रतिष्ठेच्या या स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद अखेर आले. स्मार्ट सिटीच्या कामांना गती मिळाली. स्मार्ट सिटीचे गतिमान झालेले चाक तसेच राहील, याची खबरदारी विद्यमान आयुक्त व प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी घेतली आणि वेगवेगळे प्रकल्प स्मार्ट सिटीच्या माध्यमातून राबव- ण्याचे नियोजन केले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालवण्याची जबाबदारी त्या-त्या शहराच्या स्था- निक स्वराज्य संस्थेवर असते. त्यानुसार ही जबाबदारी औरंगाबाद महापालिकेवर येणे क्रमप्राप्त होते. पण ती क्षमताच महापालिकेकडे नसल्याने हे काम स्मार्ट सिटी योजनेतून करण्याचा निर्णय डॉ. निपुण

विनायक यांनी घेतला आणि शहरात प्रथमच शंभर सिटी बस धावू लागल्या, २३ जानेवरी २०१९ ली सुरू झाली. सिटी बसची यंत्रणा खासगी कंत्राटदारांच्या ताब्यात

न देता एसटीशी करार करून राज्य परिवहन महामंडळाचे माध्यम निवडण्यात आले. मागील काही दिवसांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू होती. त्यामुळे शहर बससेवा बंद होती. त्यामुळे नागरिकांना कारण नसताना प्रचंड त्रास सहन करावा लागला. पांडेय यांनी नमूद केले की, नवीन वर्षात महापालिका व स्मार्ट सिटीची यंत्रणा बससेवा स्वतंत्रपणे चालवण्याचा विचार केली, त्या दृष्टीने नियोज नदेखील केले गेले. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याचा संप मिटत नसल्याने औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनची शहर बस सेवा अडचणीत सापडली होती. मात्र माजी सैनिकांनी शहर बसला आधार दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सुमारे ७७ दिवसांपासून बंद असलेली औरंगाबादेतील स्मार्ट सिटी बससेवा २३ जानेवारीपासून वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर पुन्हा सुरू होणार आहे. आता ब सच्या चालक व वाहकपदाची जबाबदारी ५६ माजी सैनिकांवर सोपवण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ५ मार्गावर ११ बसेस दोन पाळीत धावतील. सुरुवातीपासून ही बससेवा एसटी महामंडळाचे चालक व वाहक यांच्यामार्फत चालवण्यात येत होती. मात्र गेल्या ७७ दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर

असल्याने जशी एसटीची बससेवा बंद पडली तशीच स्मार्ट सिटी बससेवाही बंद पडली. आता एसटीचे काही कर्मचारी कामावर रुजू होत असून काही मार्गावर एसटी बससेवाही सुरू झाली आहे. मात्र सिटी बससेवा मात्र सुरू होऊ शकली नव्हती. त्यामुळे शहरात प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत होती. ती दूर करण्यासाठी मनपाचे प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून माजी सैनिकांच्या हाती ही सेवा सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

सिटी बस मुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रिक्षा पेक्षा बस नागरिकांना परवडते.

बस मध्ये सुरक्षेतेसाठी कॅमेरा आहे. संपूर्ण शहरात फ्फिरण्यासाठी एक, दोन दिवसाचे पास विक्री केले, जेणेकरून शहरभर कुठेही त्या पासचा वापर कुठल्याही मार्गावर वापरता येऊ शकतो. महिला व वय- स्कर लोकांसाठी आरक्षित सीट आहे. सर्वांत महत्वाचे बस स्वच्छ आहे. डायवर कंडक्टर यांनी प्रवाशांशी अदबीने वागता येते. जेणेकरून कोणालाही बसने प्रवास करावासा वाटले पाहिजे. शेवटी सिटी बस सुरळीत धावली आणि नागरिकांचे जगणेही सुसह्य झाले. स्मार्ट सिटी प्रकल्पात फ्फ़क्त स्मार्ट बस सेवा मिळाली आहे. मागील काही दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संप चालू होता. शहराबाहेरील बसची जी परिस्थिती होती, तीच शहरांतर्गत बससेवेची होती. ही सेवाही एवढे दिवस ठप्प होती. आता एसटीचे काही कर्मचारी कामावर रुजु होत आहेत. काही मार्गावर एसटी बससेवाही सुरु झाली आहे. मात्र सिटी बससेवा सुरु होऊ शकली नव्हती. त्यामुळे शहरात प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत होती. ती दूर करण्यासाठी मनापाचे प्रशासक तथा स्मार्टी सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून माजी सैनिकांच्या हाती ही सेवा सोपवण्याचा निर्णय

घेतला आहे. सध्या माजी सैनिक हे कामावर रूजू झाले. विद्यापिठ मध्ये शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थ्यांची जान्या येण्याची सोय होत नव्हती,आता बस सुरू झाल्याने विध्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

यस विषयी काही विशेष :

 नागरिकांच्या सोयीसाठी स्मार्ट सिटी बस सेवेअंतर्गत अनेक प्रवासी केंद्रित प्रकल्प हाती घेण्यात शाले आहेत.

टिप्पण्या