शेतकऱ्यांची व्यथा
भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो पण ह्या कृषी प्रधान नाव त्यांच्या मुळे आहे तोच फ्क्राशी चा वाटा शोधत आहे, खेड्या गावात जाद करून लोक शेती व्यवसाय करत असतात, म्हणजे खेड्या गावातून आपल्याला भूक भागवण्यासाठी ज्या धान्याची गरज आहे ते धान्य आपल्याला शेतकरी पुरवठा करत असतो, वस्त्र त्या पासुन तयार होत त्याचा कच्चा माल खेड्या मधून जात असतं, निवारा तुम्ही कितीही मोठे इंजिनिअर झाले तरी ते घर बनवणारा खेड्यामधीलचं असतो, आपल्या तीन मूलभूत गरजा पैकी तिन्ही गरजा खेड गाव देशाला पुरवत आहे. तरीदेखील खेड्यात नाही कुठली सोय खेड्यातील लोकांचे देशासाठी खरे योगदान आहे तरीही त्यांना जा ये करण्यासाठी साधा रस्ता उपलब्ध नाही, पाण्याची टंचाई आहेच, दवाखान्यात १० किलोमीटर अंतरावर जावे लागते पावसा ळ्यात तर पायी जावे लागते त्या व्यक्तिला जर पायी जाण्यास ऊशीर झाला तर त्या व्यक्तीस जिव देखील गमावा लागतो, खेड्यात नाही शिक्षणाची सोय ना शाळेत जाण्याची व्यवस्थाशहरातील मुले हुशार असता म्हणी पण ते इंजिनिअर, बिझनेसमन, होतात पण आमच्या खेड्यातील मुलगा मेजर, पोलीस या सारख्या नोर्कया करतो म्हणजे देशाची सुरक्षा त्याच खेड्यातील शेतकरी पुत्र करतो आणि तोच खेड्या तील शेतकरी राब राब राबतो आणि देशाचा अन्नदाता होतो, त्याला ना कोणती सवलत असती ना कोणाकडून अपेक्षा असतात. त्याला फ्फक्त एकच माहीत असत कि आपण कष्ट करायचे मग त्याचा काही मोबदला भेटू नाहीतर नाही भेटू तो त्याचे कष्ट चालूच ठेवतो, आणि त्याच्या ह्याच कष्टाचा फायदा सरकार, व्यापारी लोक घेत चालले आहे, शेतकऱ्यांच्या जिवावर मोठे होवून त्यालाचं पायाखालची माती समजून त्याला तुडवत चालले आहेत आणि माझा शेतकरी हवालदिन होत चालला आहे, काही शेतकरी शेती सोडून इतर व्यवसाय पाहत आहेत. खेड्यातून रोजगाराच्या शोधात शहरी भागात येत आहेत. शेतकरी व त्यांच्या कुटुंबाला दोन वेळेचे जेवण मिळणे सुद्धा कठीण झाले आहे आणि तोच जर राहिला नाही तर भारतात पण अन्न धाण्याची आयात करावी लागले हे आपल्याला विसरून चालणार नाही, शेतीत काहीच उरत नसल्यामुळे शेतकरी हालहाल झाला आहे शेतकरी हा देशाचा कणा आहे जर कणा च राहीला नाहीतर एक बाजू खचली जाते हे लक्षात घेतलं पाहीजे.
शेतकरी सकाळी लवकर उठून शेतात जातो रात्रपाळी करून याच्या त्याच्याकडून कर्ज काढून पिक आणत असतो पण त्या पिकाचा शेतकऱ्यांना खर्च झालेले पैसे पण भेटत नाही. शेतकरी हा स्वयंपूर्ण आहे पण त्याने काढून आणल्याल्या पिकाला कवडीमोल भाव भेटत आहे. शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांकडे सरकारने लवकरात लवकर लक्ष द्यायला हवे. शासनाने त्यांच्या धान्याला योग्य भाव मि ळवून द्यायला पाहिजे शासनाने इतर भालतु भानगडी कडे दुर्लक्ष करून तो देशाचा अन्न आपल्याला पुरव तो त्याच्याकडे लक्ष केंद्रित करून त्याचे हाल होण्यापासून वाचून देशाचा अन्नदाता वाचावा राजकारण जेवायला देत नाही हे लक्षात घेऊन काम करायला पाहीजे. शेतर्कयांची काय कोणाला चिंता राहिली नाह जो कोणीही आपापल्या खुर्ची च्या नादात आहे, साहेब आम्ही जर पिकवलचं नाही तर तुम्ही काय पैसे खाणार का ?
शेतकरी मेला काय जगला काय ? सांगा कोणाला फरक पडतो ?
हा नेता त्या नेत्याला वाईट बोलला....तो नेता ह्या पक्षात गेला. हा नेता भ्रष्टाचार मध्ये लटकला, जगाचा पोशिंदा मात्र झाडावर लटकवून मेला....शेतकरी मेला काय जगला काय ? सांगा कोणाला फरक पडतो ? भारत कृषी प्रधान का भ्रष्टाचारप्रधान हाच मोठा प्रश्न पडतो. अरे एखाद्या नेत्याला दोन दिवस ऊस तोडायला घेऊन बघा.शेतकऱ्यांचं जिवन एक दिवस तरी जगून बघा. शेतकरी मेला काय जगला काय ? सांगा कोणाला फरक पडतो ? नेत्यासारखे आरामदायक जिवन नको आम्हाला फक्त आम्हाला पिकाला भाव द्या..... शेतकरी मेला काय जगला काय ? सांगा कोणाला फरक पडतो ? शेतकरी पुत्र
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा