अजिंठा लेणीचा एक अनुभव
औरंगाबाद शहराची ओळख एक ऐतिहासिक शहर म्हणून प्रचलित आहे. या शहराला नेहमी फक्त भारतीय नाहीतर विदेशी पर्यटक आवर्जून बघण्यासाठी येतात. शहरात विविध स्थळ हे बघण्यासा रखे आहे जसे की बीबी का मकबरा, पाणचक्की, सिद्धार्थ गार्डन, अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. अशीच एक सफ्फर अजिंठा लेणीची आपल्या सर्वाच्या भेटीला....
युनेस्कोच्या जागतिक वारसा वास्तूंच्या यादीत १९८२ मध्ये समाविष्ट झालेल्या अजिंठा लेण्या औरंगाबाद शहरापासून १०७ किलोमीटरवर स्थित आहेत. वाघोरा नदीच्या प्रवाहापासून सुमारे ७६ मी. उंचावरील घोड्याच्या नालाच्या आकारातील डोंगरात अजिंठ्याच्या तीस गुहा कोरण्यात आल्या आहेत. औरंगाबादपासून ते अजिंठ्यापर्यंतच्या दोन-अडीच तासांचा कालावधी लागतो.
१९ व्या शतकाच्या सुरुवातीला वाघाच्या शिकारीच्या निमित्तानं ब्रिटिश अधिकारी मेजर गिल स्मिथ जॉन या परिसरात आला असताना त्याला इथल्या १० व्या क्रमांकाच्या गुहेच्या कमानीचा थोडा सा कोरीव भाग उघडा दिसला होता. त्याच्या माहितीवरूनच पुढे इथं उत्खनन करण्यात आलं आणि एक-दोन नव्हे तर तब्बल तीस लेण्यांच्या रुपात प्राचीन भारताच्या इतिहासाचा अनमोल ठेवा आपल्या ला पाहता येऊ शकला. ख्रिस्तपूर्व २०० ते इसवी सन ५०० ते ६०० अशा सुमारे आठशे वर्षांच्या कू लावधीत दोन ठळक टप्प्यात कोरण्यात आलेल्या आहेत.
हा निसर्गसौंदर्याने नटलेला परिसर आपल्याला एक ह्या धावत्या माणसाच्या गर्दीपासून शांत करतो. आपल्या पूर्वजांच्या कलेला समजून घेण्यासाठी आपला मेंदू पुढे सरसावतो आणि हर एक नक्षी काम बारकाईने बघत बघत समजून घ्यायला लागतो. विदेशी पर्यटक मोठ्या उत्साहात हातात कॅमेरा घेऊन प्रत्येक कला कॅमे-यात कैद करत राहतात. त्याची विलक्षण इंग्रजी भाषा आपल्याला थोडी उमगते पटकन. पण एक मात्र नक्की जाणवते की ही लोक कलाप्रेमी आहेत यांना कलेला जपून ठेवावं वाटतं नाहीतर आपल्याकडं कशाचं काय विद्रुपीकरण करतील सांगता येत नाही. एखाद्या दगडावर मोठं विचित्र आकार काढून वाकड्या तिकड्या रेषा ओढून नावं रेखाटणारी मंडळी भलतीच आपली. प्रत्येक लेणीतले अवाढव्य आणि चित्र बोलके आहेत जस जशी आपण बारकाईने दगडावर कोरलेली नक्षीकाम वेगळे वेगळे प्राणी आणि हा डोंगर बघतो आणि या सगळ्या वातावरणात चंद्राच्या कोरीप्रमाणे मिटवले ल्या शांत आणि तितक्याच भेदक नजरेत पद्मपानी बोधिसत्व ध्यान साधनेला बसलेला दिसतो. ह्या बो धिसत्वाला बघितलं की भरकटलेले मन एका जागेवर येतं. आणि स्वतःशी संवाद करू लागतं
या तीस लेण्यांपैकी ९, १०, १९, २६ व २९ या पाच लेण्यांत चैत्यगृह आहेत. उरलेल्या सर्व लेण्या वहार आहेत. इथल्या सहा लेण्यांची निर्मिती ख्रिस्तपूर्व दुर्सया शतकात बौद्ध धम्माच्या हीनयान पंथाच्या काळात झाली. यामध्ये ९, १० या चैत्यगृहांसह १२, १३ व १५ व्या विहारांचा समावेश आहे. उरलेल्या लेण्या पुढे महायानपंथाच्या काळात निर्माण करण्यात आल्या. याठिकाणी हीनयान आणि महायान यू 'च्यातील ढोबळ फ्फरक असा सांगता येईल की हीनयान हे मूर्तीपूजक नसून स्तूप किंवा जीवनचक्रासा रख्या प्रतीकाची उपासना करतात तर महायानपंथी मूर्तीपूजक असतात.
माध्यम विशेषांक : ४५
तथागत बुद्धाचं बालपण ते निर्वाण प्राप्ती पर्यंतचा प्रवास इथं कोरलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' ह्या ग्रंथात बुद्धाचे केलेले वर्णन आपण उघड्या डोळ्यांन बघतोय असा भास होतो. मग हा बुद्ध उलगडू लागतो दुःखाची किनारे आणि घेऊन जातो दुःख मुक्तीच्या सम्यक साग राकडे आणि सांगतो या जगात प्रेमाशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट मोठी नाही. अन प्रेमाची गोड फळे आ पणाला चाखायला शिकवतो. अशा या तथागताची कहाणी ही लेणी सांगते.
आजच्या विषमतेच्या काळात आपण नक्कीच एकदा तरी ह्या ठिकाणाला भेट देऊया आणि 'जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा' हा समतेचा संदेश चहूदिशांना घेऊन जाऊयाः
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा