छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगाबाद ला दिलेली भेट व वेरुळ गढ़ी
खड़की, फतेहनगर, औरंगाबाद, आणि छ. संभाजीनगर... हे सर्व एकाच शहराचे नावे आहेत, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहराला अनेक ऐतिहासिक वास्तु नी वेढलेले आहे. याच ठिकाणी ज्ञानोबांनी रेड्या मुखी वेद बोलवले, याच ठिकाणी नाथांनी आपल्या भारुडा मधून समाजप्रबोधनाची धुरा सांभाळली. १२ ज्योतिर्लिंग पैकी एक असलेले घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग ही इथेच. भक्ति आणि शक्तिया संगम म्हणजे हे शहर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे शहर... स्वराज्यात पुरंदरचा अवघड तह झाला आणि त्या तहानंतर छत्रपती शिवाजी महा राजांना बादशाह औरंगजेबाने आर्याला बोलवले. मिर्झाराजे जयसिंग यांच्या विनंतीवरून १६६५ रोजी छ्छ्त्रपती शिवाजी महाराज आर्याला जाण्यास निघाले. महाराजांचा मार्ग राजगडावरून नगर-शेवगाव- पैठण आणि औरंगाबाद असा होता. संभाजी महाराज हेही सोबत होतेच. औरंगाबाद जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला मुक्काम पडला तो पैठणला, पैठणला मुकाम झाल्यानं तर महाराज बिडकीन बाभूळगाव या मार्गे औरंगाबादेत दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराज औरंग ाबादेत दाखल झाले तेव्हाचे वर्णन भीमसेन सक्सेना या समकालीन इतिहासकाराने नमूद करून ठेवलेले आहे आणि ते फार रोमांचक सुद्धा आहे. शिवाजी महाराज हे ५०० घोडदळ आणि ५०० पायदळ आणि इतर पूरक गनुष्यबळासह शहरात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांचा लवाजमा हा डोळ्यात भरण्यासार खा होता.
छत्रपती शिवाजी महाराजांचे मूळ वंशज याच भागातले होते. त्यामुळे त्यांचे चाहतेही औरंगाबाद आणि परिसरात खूप होते. त्यातच शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची किर्ती ही सर्वदूर पोहोचली होती. महाराज औरंगाबाद शहरात प्रवेश करत असताना भीमसेन सक्सेना संगलाल त्याप्रमाणे, शिवाजी महाराजांना पाहण्यासाठी शहरातील आणि आसपासच्या खेड्यातील नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. अनेक किलोमीटर चालून लोक शिवाजी महाराजांना पाहण्यासाठी आले होते. औरंगाबाद शहाची गल्ली बोळ माणसांनी फुलून गेला होता. इतकी तोबा गर्दी झाली होती. तशी त्यांना भेटण्यासाठी हितचिंतकांचीही प्रचंड गर्दी राजवाड्यात झाल्याचा उल्लेख या समकालीन इतिहासकाराने केलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगाबाद शहरात दाखल झाल्यानंतर त्यांचा मुक्काम हा जयसिंग पुऱ्यातील मिरझा राजे जयसिंगच्या वाड्यात होता. त्या वाड्याच्या ठिकाणी आता श्रीकृष्ण अ पार्टमेंट उभे असल्याचे अनेक इतिहासकार सांगतात. यानंतर तब्बल ३ दिवस शिवाजी महाराज हे औरंगाबाद शहरात मुक्कामी होते. या मुक्कामात त्यांनी आसपासचा बराघसा परिसर पिफरला असल्याचे ही अनेक दाखले उपलब्ध आहेत. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाने प्रवासासाठी उप लब्ध करून दिलेले १ लाख रुपये औरंगाबाद येथून घेऊन आर्यासाठी रवाना झाले.
या ३ दिवसांशिवाय छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा औरंगाबादला आल्याचा उल्लेख कुठेही आढळत नाही. औरंगाबाद शहाराला पवित्र करून टाकणाऱ्या त्या ३ दिवसानंतर छत्रपती शिवराय पुन्हा कधीही औरंगाबादेत आले नसले. तरी, त्यांची मुळे मात्र याच मातीतली होती. आजही बेरूळ या
ठिकाणी मालोजीराजे यांची गढी अस्तित्वात असून, त्याठिकाणी आता एक छोटेखानी रमारकही उभे करण्यात आले आहे.
आज आपल्या या शहराला ५२ दरवाज्याय शहर म्हणतात, बीबी का मकबरा, किल्ले देवगिरि, पानचक्की, बघायला लाखो पर्यटक येतात, पन आपल्या पैकी किती जणांना माहिती आहे की महाराष्ट्रा च्या महापित्याचा म्हणजेच स्वराज्य संकल्पक शाहजी महाराजांचा जन्म याच शहरात झाला, वेरुल येथे शाहजी महाराजांचे बालपन गेले, आजही मालोजी राजे भोसले गढि तेथे आहे, शाहजी महाराजांचे देशातील पाहिला पूर्णकृति पुतळा तेथे आहे. पन गढ़िची मात्र दुर्दशा झालेली आपल्याला बघायला मिळते, ज्या ठिकानावरून स्वातंत्र्याची ठिनगी पडली आणि नंतर आलम हिन्दोस्तान भर पसरली, स्वा तंत्र्य सूर्य ज्यांच्या मुळे आपल्याला कळला त्यांचे स्मारक मात्र सध्या अंधारातच आहे.
ज्यांच्या पीढयामुळे आज आपल्या पीढया श्वास घेत आहे, अशा ठिकाणी आपन सर्वानी आवर्जून नतमस्तक होण्यासाठी गेले पाहिजे भव्य मशाल पदयात्रा रांजनगाव (शें. पु.) येथील शिवभक्तानी है स्मारक प्रकाशज्योतात आनन्यासाठी दरवर्षी शिवजयंती ला वेरुळ ते रांजनगाव भव्य मशाल पदयात्रेचे आयोजन केले जाते. माझी औरंगाबाद व शहरा बाहेरिल सर्व शिवभक्ताना विनंती आहे की अपनहीं या शिवकार्यात सहभागी व्हावे, आणि पुरातत्व विभागाला व सरकारला जाग येऊन पुन्हा या गढ़ीला आपले गतवैभव प्राप्त होईल...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा