या ज्ञान पाखरांनो परत फिरा क्रांती भूमी नागसेन वनाकडे

 शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा' असा क्रांतिकारी मंत्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजाला दिला. व्यक्ती, समाज, राष्ट्र आणि राज्य यांना शैक्षणिक दृष्टी देणारे डॉ. बाबासाहेब हे बुद्ध, फुले, शाहूंच्या शैक्षणिक धोरणाचा गाडा ओढताना दिसतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, 'आजच्या सामाजिक दुखण्यावर एकमेव औषध आहे ते म्हणजे शिक्षण' अशी त्यांची शिक्षणाविषयी ची भूमिका ही शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करते. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठवाडा प्रांतावर हैदराबादच्या निजामाचे राज्य होते. निजाम हे आधुनिक शिक्षणाच्या बाबतीत उदासीन होते. त्यामुळे इतर प्रांतापेक्षा मराठवाड्याचा सामाजिक व शैक्षणिक विकास खुंटला होता. याच दुखण्यातून मुक्त करण्यासाठी औरंगाबाद शहराला चांगल्या शैक्षणिक संस्थेची गरज होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीन, दलित, दुबळ्या समाजाला गुलामगिरीतुन बाहेर काढण्यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेतुन महाराष्ट्रतील शैक्षणिक चळवळीला चालना दिली. पीपल्स एज्युकेशन सोसायटी या डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या संस्थने दीन, दलित वंचीत घट- कांना शैक्षणिक चळवळीत त्या प्रवाहात आणलं. म्हणून या समाजाच्या जगण्यांला अर्थ प्राप्त झाला. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा जन्म ८ जून १९४५ ला झाला या सोसायटी साठी बाबासाहेबांनी एक घटना लिहली जर कुणीही संस्थेच्या ध्येय, उद्दिष्ट याच्या विरोधात वागत असतील तर त्यांना कडक कारवायां करता येतील अश्या लोकांना धाक असावा म्हणून एक घटना लिहिली गेली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी साठी २५० एकर जमीन औरंगाबाद येथे घेतली आणि संस्थेचा विस्तार वाढवला. मराठवाड्यात दलित, शोषित, वंचित समा- जाला शिक्षणासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती तेव्हा या समाजाला शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घे- ण्यासाठी बाबासाहेब यांनी औरंगाबाद येते २५० एकर जमीन घेऊन नागसेन वनाची निर्मिती केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९ जून १९५० साली औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालयाच्या रूपाने उच्च शिक्षणासाठी जी व्यवस्था केली ती क्रांतिकारीच होती. मराठवाड्याच्या इतिहासात डॉ. बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून या समाजाच्या सामाजिक, आर्थिक जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. डॉ. बाबासाहेब यांनी उच्य शिक्षणाद्वारे समता, स्वातंत्र्य, बंधुता या वर आधारित समाज निर्माण करायचा होता म्हणून या समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले सिद्धार्थ कॉलेजचा पाया रचून मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. शैक्षणि- कदृष्ट्या निजाम मराठवाड्यात प्रगत करण्यासाठी निजाम मीर उस्मान अली खान बहादूर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दलित समाजाच्या विकासासाठी चाललेली तळमळ, समाज परिवर्तन- साठी चाललेले लढे निजामानीं समजुन घेतले होती व बाबासाहेबांना मदत करताना निजाम उस्मान अलीखान बाबासाहेबांनी १९४५ मध्ये मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटी ची स्थापना केली, दलि तांना महाविद्यालयिन शिक्षणाचा लाभ मिळावा व त्या मधून नवे नेतृत्व निर्माण व्हावे हा हेतू होता, निजाम यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीला पाच लाख रूपायाची देणगी दिली, या देणगी वरच बाबा साहेबानी मुंबईला सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केले होते.

बाबासाहेबानी १९ जून १९५० ला औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय सुरू केले, या महाविद्यालयासाठी निजामार्नी जमीन आणि बारा लाख रुपये बिनव्याजी दिले. ९ लाख इमारती साठी ३ लाख फर्निचरसाठी. दलित समाज शिकावा म्हणून दलित समाजातील समाज सुधारकांनी शाळा सुरू केल्या, १९३९ मध्ये निजामानीं दलित समाजाच्या या शाळा व शिक्षणासाठी एक लाख रुपये मंज र केले, अर्थ साह्य का केले म्हणून मीर उस्मान अली यांच्यावर टीका पण करण्यात आली, त्यांनी मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दलितांसाठी शाळा स्थापन केल्या होत्या. मे १९४७ रोजी दलित समाजाच्या विकासासाठी एक कोटी रुपायाची मान्यता देऊन एक विश्वस्त मंडळ निर्माण केले होते.


डॉ. बाबासाहेबांनी उभा केलेले हे शैक्षणिक संकुल आज रसातळाला गेल आहे. महाविद्यालयाच्या दुरव्यवस्थेला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी. माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन शासनाच्या साह्याने महाविद्यालयाला गतवैभव मिळवून द्यावे.

टिप्पण्या